रामदास सांगे दासबोधी वर्म
रामदास सांगे दासबोधी वर्म ।
गुरुचे जे कर्म यथासांग ॥
ज्याची दिनचर्या शुद्ध नाही झाली ।
वासना निमाली नाही ज्याची ॥
त्याग नाही अंगी, नाही प्रेम-झरा ।
भक्तिच्या उदरा गेला नाही ।।
तुकड्यादास म्हणे ऐसा नव्हे गुरू।
जाणा पोटभरू जगामाजी ? ।।