कळते पण मन का न वळे? कळते पण

कळते पण मन का न वळे? कळते पण ॥|धृ०॥।
वेद-विधी, शास्त्रे जरि पढला, पंडितभाव उगा खवळे ।|१।।
श्रुती, शास्त्र हे शब्द विनोदी, वेदांती भवधारि पळे ।।२॥।
साधन, आसन केले कितिही, दृढ कर्माविण ते न फळे ।।३।।
सुसंगतीविण व्यर्थ विरागी, स्वतंत्रपण ते जागि जळे ।।४॥|
जोबवरि लीनपणा नच आला, तोवरि भक्ती भूल गिळे ।।५ ।।
तुकड्यादास म्हणे विण केल्या, यम-दंडा सुखवार मिळे ।।६।।