दारोदारी ऐसे फिरती गोसावी
दारोदारी ऐसे फिरती गोसावी ।
किंगरी वाजवि भिक्षा मागे ।
तयासी को म्हणू गोपिचंद आम्ही ? ।
काय त्याची उर्मी जरा आहे ? |
बहुरूपी सोंगे घेवोनी फिरती ।
पूजा काय रीती द्यावी त्यांची ? ॥
तुकड्यादास म्हणे जाणावे जाणोन
जेथे शुद्ध ज्ञान तोचिं गुरु ।।