ईशवराच्या नामें साधतील स्वार्थ
ईश्वराच्या नामे साधतील स्वार्थ ।
तया कैचा अर्थ संसारिया ? ॥
साधु म्हणवोनी करितील चैन । तयासी पतन चुके केवी ? ॥
भीक भिक्षुकासी पचावयासाठी । पाहिजे संपुटी पुण्य बाहू ॥
तुकड्यादास म्हणे सुलभ हे नाही । फुटतील देही पाप सर्व ॥