जगी गेला तुझा प्राण l तरी न सोडी चरण
जगी गेला तुझा प्राण । तरी न सोडी चरण ॥
ऐसा धरशील भाव । तरी पावे सदगुरु राव ।।
नाही तरी सिंदळीच्या । व्यर्थ बरळसी वाचा ॥
काय सांगू रे ! नमूनी ? । ऐकुनि न सोडिसी करणी ॥
तुकड्या म्हणे ऐसे करी । सदगुरु - चरण दुढ धरी ॥