घेई घेई नाम हरीचे

घेई घेई नाम हरिचे । जळतिल दोष ते पापाचे ॥
डोई प्रपंची आधी लीन । करी स्वाधीन सर्व मन ।
का हिंडसी रानोरानी ? । लाग सद्गुरुचे चरणी ॥
मार्ग भेटेल तुजला । घेई रामनामी प्याला ।।
लक्ष ठेवी ब्रह्मानंदी । मग होशिल आत्मछंदी ॥
धूम्रपान का करिसी ? । तेणे व्यर्थ फजीत होसी ॥
आला आडकुजी ताराया । त्वरीत लाग त्याचे पाया ॥
तुकड्यासी ठाव दिला । पाजोनिया प्रेम - प्याला ।।