आनंदाचा दिवस आज l ऊठली कल्पना सहज

                     प्रथम साधन - लीनता
आनंदाचा दिवस आज । उठली कल्पना सहज ।।
माझे मना ऐसे वाटे । सखा राम कधी भेटे ? ॥
संत ऐसे हो वदती । धरी लीनता, ती शांती ॥
सत्य कळवळ्यावाचून । राम सखा तो भेटे न ॥
तुकड्या म्हणे भक्ती करी । पश्याताप हृदयी धरी ॥