जळो त्याचे मोठेपण l नाही रामाचे स्मरण

जळो त्याचे   मोठेपण । नाही रामाचे स्मरण ॥
मिळोनिया योनी ऐसी । लावियली विषयी खासी ॥
ऐसा कैसा अहंकारी । संत - चरण ना धरी ।
तुकड्यादास म्हणे थोर । करी जो नामाचा गजर ॥