श्रेष्ठ नर त्यासी करावे नमन

श्रेष्ठ नर, त्यासी करावे नमन । तेथे मानापमान पाहू नये ।
साधूसंत यांचे धरावे चरण । प्रसादा प्रमाण सोडू नये ॥
नितिधर्म याचा करावा स्वीकार । तेथे सानथोर पाहू नये ॥
म्हणे तुकड्यादास लीन राही बापा ! । चुकवाया खेपा चौ-यां शीच्या ॥