असशि अज्ञानी ठेवी रे ! लीनता
असशी अज्ञानी ठेवी रे ! लीनता । तेणे ती अहंता गळो लागे ॥
गळाली अहंता काम - क्रोध सारे । क्षमा वास करे शांती तेथे ॥
क्षमाशांती जेथे सदा वास करी । तो एक श्रीहरी बनलासे ॥
म्हणे तुकड्यादास हेची माझी आस । झालो मी उदास पायापाशी ॥