गेले दिवस पुढे आणू नका

(चाल: मुरलीवाले मूरली बजा...)
गेले दिवस पुढे आणू नका ।
केलेले पाप मनि मानू नका  ॥धृ०।।
गरिबांची दैना, पाहोनि नयना ।
दुःखी न होता, कराव्या चैना ।
हेकुछलं ज्ञान आणि हा कुठला शहाणा ?
आता असे गरिबांना जाणू नका ।
कराल तसेच तरी बसेल धक्का ।।१॥
मानवामानवात पाडोनि झगडा ।
या जातिपातीचा लावोनि पगडा ।
सारा समाज याने करोनि लंगडा ।
आता जातपात कोणि सांगू नका ।
तुकड्या म्हणे, धड वागा निका ॥२।l