जीवन व्यर्थचि घालु नको रे,
(चालः पैजणे हरिची वाजली...)
जीवन व्यर्थचि घालु नको रे, वाइट मार्गे चालू नको ॥धृ॥
जे आळस घेउनिया बसती, अजवरि झाली त्यांची फजीती ।
तू त्या मार्गी लागुनि तरुणा, हे वय मातित कालु नको ॥१॥
उद्योगाविण जगती कोणी, न मिळो त्यांना फुकेच पाणी ।
पाणीच नाहि अन्नही कुठले ? अंगावरती शालु नको ॥२॥
उद्योगी जे असतील बंधु, अम्ही तया प्रियतेने वंदू ।
उत्पादक ते दीप जगाचे, म्हणे तुकड्या त्या मालु नको ॥३॥
-गुरुकुंज, दि. ०६-११-१९५५