उगिच कशाला देशभक्तिचा
(चालः आदर्शाची मिरासदारी...)
उगिच कशाला देशभक्तिचा, वेष घालुनी थाट असा ।
गरिबजनांना फसवुनि घेशी, उगाच देउनि दाट असा ॥धृ०॥
हाती धरोनी गुंड-दारुडे, जनलोकांवर धमक धरी ।
इमान सारे खर्चुनि बसला, कोण तुझा विश्वास करी ? ॥१॥
उसनवारिने घेउनि पैसा, देशी न त्यांच्या बापाला ।
दिवसाढवळ्या घुसखोरीने, लुबाडितोसी गरिबाला ।।२।।
इकडुनि तिकडुनी लोक जमवुनी, निवडुनी आला कसा तरी ।
पचेल का अधिकार अखेरीस! विचार कर रोजची घरी ॥३॥
मोठ्यांची जय बोलुनि, बोलुनि, कलंक त्यांना लावी कसा ।
समजुनि गेले लोक अता तर चाित्र्याचा तुझा ठसा ॥४॥
अंतर्मुख बघ आपणाला, काय मी केले पाप तरी ।
तुकड्यादास म्हणे नाहीतर, लोक मारतील पैजारी ।।५॥
- वाल्मिक-निवास, दि. ०८-११-१९५५