जीव जातोना, जातोना, जातोना रे !

(चालः राधा ना बोले, ना बोले...)
जीव जातोना, जातोना, जातोना रे !
तुज पाहण्यासी जीव माझा झुरे ।।धृ०।।
जन्मभरी  तुझी   पाहिली   वाट ।
हृदयाच्या आसनी करोनी थाट ।
आवरी आता ना   मन   बावरे ।।१।।
काही  सुचेना  भांबावलो    मी ।
उरलोना लोकी देहाच्या कामी ।।
उरले    तुझे    बघ   प्रेम   रे  ! ।।२।।
सांगाया आलो अंतीची मात ।
भेट तरी आता, पाहि ना अंत ।।
तुकड्याची  माया   पायी   झुरे ।।३॥
- श्रीक्षेत्र वरखेड, दि. २८-११-१९५५