तू कोण ? तू कोण ? तू कोण रे !

(चालः राधा ना बोले, ना बोले...)
तू कोण ? तू कोण ? तू कोण रे !
तुज पहाया जीव   माझा   झुरे ॥धृ०॥
आता तू लहान,मोठा मग होसी ।
म्हातारा होऊनि स्मशानी जासी ।
एकही    नाही    तुझे      खरे ।।१।।
देह तू आहे की देहाचा साक्षी ?
जीव तू आहे की शिवाचा पक्षी ?
कोण म्हणावे   समजेना   रे ! ।।२।।
माझ्या मते तूच सर्वत्र आहे ।
तू जाणता सर्व सर्वत्र साहे ।
तुकड्या म्हणे सांगना हे  खरे ।।३।।