जना बोल जरा ते ! म्हणा, रिकामे का राहता ?
(चालः मन मोह गई रे, ज्यारी कृटिया...)
जना बोल जरा ते ! म्हणा, रिकामे का राहता ? I|घृ०॥
देहासि पाहिजे अन्न, वस्त्र, झोपडे ।
हे सर्व आळसाने कैसे तुम्हा आतुडे ?
दुसर्याच्या शोषणासि सुखे पाहता ।
म्हणा, रिकाम0।।१।।
आपणास हवे जे, सर्वांना मिळू दे ।
सर्वाशी प्रेमभाव सर्वांचा जुळू दे ।
संतांची ही वाणी उगी टाळता ।
म्हणा, रिकामे 0।।२।।
सर्वांनी खावे, सर्वांनी गावे ।
उद्योगी होऊनि सर्व सुख ल्यावे ।
तुकड्या म्हणे व्यर्थ दुःख साहता ।
म्हणा, रिकामे0।।३।।
-कौंडण्यपूर, दि. ३०-११-१९५५