अम्ही क्रांतीचे वीर गडी रे !
(चालः पैजणे हरिची वाजली...)
अम्ही क्रांतीचे वीर गडी रे !
सरळ करू बिघडली घडी ॥धृ०॥
क्रान्ति कुणाची क्रूरपणाची ।
तरवारीची अन् तोफांची ।
आमुची क्रांती शांति शिकविते, प्रतीक त्याचे वीणा - चिपळी ॥१॥
सद्भावाचा तार गुंगवी ।
विशाल बुद्धी हृदयी भरवी ।
करी पालट मग जीवनि साऱ्या, म्हणुनिच तुकड्या घेई उडी रे ।।२।।
- गुरुकुंज, दि. ०६-११-१९५५