अमुचा सर्वांचा तूच हरी
(चालः में ए छोटासा बच्चा हूँ...)
अमुचा सर्वांचा तूच हरी ।
अन्य कुणाचे ध्यान, करावे सांग तरी ? l।धृ०।l
सर्व घटी अणि सर्व मठी तू, व्यापक पंढरिराणा ।
असे असुनिया भक्तासाठी घे अवतार सगुणा !
अनुभव सगळ्यांना हा येतो, मग कोणाचे पाय, धरावे सांग तरी ।।१॥
जेथे भक्त तुझे सत्कार्यी रमती जिव लावूनी ।
तेथे तू प्रगटलास म्हणती मायारुप दावूनी ।।
जैसे प्रल्हादा रुप दावी, का इतरांचे नाम, भजावे सांग तरी ? ॥२॥
अमुचे सुख-दुख तुझ्याच पायी, सांगुनि मन रमवावे ।
तुकड्यादास म्हणे जगदीशा ! व्रत ऐसे टिकवावे ॥
नाही का म्हणशी ? कोणाला-
अंतकाळि गुरुमाय, म्हणावे सांग तरी ? ।।३॥