विषय लागे गोड गोड

विषय लागे गोड गोड । न पुरे मनाचे ते कोड ॥
वैराग्य ये क्षणोक्षणी । म्हणे काय करू मनी ॥
षड्विकार तो न सुटे । काळ क्रोधाग्नीने भेटे ॥
तुकड्या म्हणे पश्चातापे । बहू निरसती पापे ।