जोवरी विषय न सुटती पाच
जोवरी विषय न सुटती पाच । तव साधकास भंग होई ।।
क्राम क्रोध यास करील जो दुरी । तो एक श्रीहरी बनलासे ॥
लक्ष्याचे अलक्ष्य चित्त ज्याचे झाले । स्वरूपी मिळाले तोचि तरे ॥
तुकड्यादास म्हणे अद्वैत ते वृत्ती । त्याची सिद्धस्थिती झाली असे ॥