ज्ञानी सांगतो पुराण l जाई घरामाजी मन

                  मनोजयातच उद्धार
ज्ञानी  सांगतो   पुराण । जाई घरामाजी मन ॥
काय बसोनिया सुखे ? । गुरु-नाम वदा मुखे ॥
जेथे जेथे जाई मन । आणि तेथोनी ओढोन ॥
साध तुकड्यादास म्हणे । रामरूपी ते राहणे ॥