करिता विचार जाई डोके खोल

करिता विचार जाई डोके खोल । मनही चंचल वाटू लागे ॥
विचार तो ऐसा करावा अंतरी । वाचा हरी - हरी वदो लागे ।।
नित्यनेमे ऐसे करावे हो काम । जेणे आत्माराम सुख देई ।।
म्हणे तुकड्यादास मनाचे सांगाती । नर्ककुंडी जाती यमाघरी ।