हळूहळू थोडा करुनी विचार

हळूहळू थोडा करूनी विचार । हृदयी सारंगधर साठवावा ।
नको करू ऐसे सांगे जो मनासी । पुढे अहर्निशी बळ वाढे ॥
म्हणूनिया बोध शरीरी साठवा । मनासी राबवा रामनामी ॥
म्हणे तुकड्यादास रीघ न ठेवावी । संगती धरावी सज्जनांची॥