श्र्वणासी ती विष्ठा जैसे गोड लागे
त्रिगुणांचे मायाजल
श्र्वानासी ती विष्ठा जैसी गोड लागे । तैसा मायेसंगे प्राणी बुडे ॥
करील जो भक्ती एकनिष्ठ भावे । तया हे सांगावे न लागेचि ॥
आपोआप दृष्टी फुटे ती ज्ञानाची । मग त्या जगाची गोडी कैची ? ॥
तुकड्यादास म्हणे मायेचिया गुणे । असोनि शहाणे मूर्ख होती ॥