सांगेन स्वभाव रजोगुनियाचे

सांगेन स्वभाव रजोगुणीयाचे । त्यास विषयाचे सुख फार ॥
वृथा अंगावरी गर्वाचा तो थाट । चेष्टेचा बोभाट करी फार ॥
वृत्तीचा उमाळा भरे हृदयात । देवावरी प्रीत सुखासाठी ॥
तुकड्यादास म्हणे ऐसे स्वार्थी नर । तयासी दुर्धर यम ओढी ॥