क्रोध - मोह - भय - धुंदी ज्यासी
क्रोध-मोह-लोभ-भय-धुंदी ज्यासी । तो तमोगुणासी वश झाला ।।
न मानी कुणाचे, म्हणे मीच आहे । नशेमाजी राहे आळवी तो ॥
करी हिंसाचार, नाही ज्या कदर । होती श्रम फार तयालागी ॥
तुकड्यादास म्हणे तमोगुणी नरा । न चुके हो ! फेरा चौऱ्यांशीचा ॥