सत्वगुण ज्याचा उंचावला वरी

सत्त्वगुण ज्याचा उंचावला वरी । त्याची सांगो थोरी काय आता ॥
शम दम दया - शांतीचा तो वास । न करिच आस इतरांची ॥
नीतीने चालणे हाच ज्याचा धर्म । न सांडीच कर्म क्रिया काही ॥
तुकड्यादास म्हणे सत्त्वगुणी खरे । संगती धरी रे ! त्यांची आधी ॥