राही रे ! जगृत चोर बहू येती
राही रे ! जाग्रृत चोर बहू येती । तुज फरसविती ॥
पाच - सहांचा तो एक असे मेळ । याच गुणे काळ धावे मागे ॥
धरूनिया सत्व सांडा रे ! तामस । गुरु सावकाश स्मरा तुम्ही ॥
सद्गुरुवाचून गड्या ! न वाचसी । रूप अविनाशी तुकड्या म्हणे ॥