वासनेच्या संगे पाच ते विषय
वासनेच्या संगे पाच ते विषय । यासी हो ! उपाय आधी करा ॥
मोक्षाचे साधन हेचि करा आधी । तोडा या उपाधी त्रिगुणांची ॥
सत्त्व करा पुढे दोन टाका मागे । तेव्हा वेगे लागे मोक्ष - वाट ॥
तुकड्यादास म्हणे वासना तुटेना । तोवरी यातना भोगी भोगी ॥