रूप ते मायेचे अनेक प्रकार

रूप ते मायेचे अनेक प्रकार । शोधावया सार वैराग्य ते ॥
जग हेचि मिथ्या वाटे जया नरा । तो एक सोयरा वैराग्याचा ॥
शुद्ध तत्त्व त्याचे आले असे हाता । गुणधर्म पाहता बुडाला तो ॥
तुकड्यादास म्हणे नेणवे मजसी । स्वरूप अविनाशी काय आहे ? ॥