जोवरी तो भोग न सुटे कर्माचा

जोवरी तो भोग न सुटे कर्माचा । तोवरी कोणाचा ताबा नाही॥
मारतील संत कर्मावरी मेख । परी भक्ती चोख पाहती आधी ॥
दिले  संते   आम्हा   वरदान । तरी ते प्राक्तन  म्हणो  केवी ? ॥
तुकड्यादास म्हणे अवघाही अंधार । मायागुणे सार वाटे मज ॥