संचिताचे योगी भोगी सर्व कर्म

संचिताचे योगे भोगी सर्व कर्म । ऐसे जरी वर्म म्हणता तुम्ही ॥
तरी ते संचित जाहले हो ! केव्हा ? । याची वाट दावा मजलागी ॥
मागचे भोगिता पुढे होई बंद । ऐसाही तो वाद वाढो लागे ॥
तुकड्यादास म्हणे मी केले जो करी । तयासीच फेरी लागे त्याची ॥