व्हाव्यासी मुक्त देही

व्हावयासी मुक्त देही । वासना ती नको काही ॥
करूनिया खटाटोपी । मन होई चंचल   आपी ॥
वासना ती तोडावया । शरण   जाई   गुरुराया ।
तुकड्या म्हणे वाया गेला । एका अहंते लागला ॥