त्रिकालही ज्ञानी जरी झाला प्राणी
त्रिकालही ज्ञानी जरी झाला प्राणी । अहंते लागुनी वाया गेला ।।
थोर-थोरांचाही झाला अपमान । तेथे तो दीन, काय चाले ? ॥
नारदासारिखे शिरोमणी भक्त । परी ते आसक्त विषयात ॥
तुकड्यादास म्हणे वाटे मज भय । सांगा हो उपाय गुरुराया !॥