काळ आला जरी घरी

काळ आला जरी घरी । वासना न यासी परी ॥
तृप्त झाल्या त्या कल्पना । वश ज्यासी श्रीगुरुराणा ॥
नाही वासना कशात । डुले सहजसमाधीत ॥
तुकड्या म्हणे हो काळासी । धाक पडे धरायासी ।।