गोड तुझी मरली, ऐकुनिया सुध हरली

( चाल : जायें तों जाये कहाँ . . . ) 
गोड तुझी मरली, ऐकुनिया सुध हरली । 
मम भुलली ही , वृत्ति भली ॥ धृ० ॥ 
सहज मी बसलो आसन धरुनी , ध्यान तुझे ते अंतरि स्मरुनी । तन्मयता कर्णी स्फुरली ॥ १ ॥ 
अनहत वाद्ये वाजति नाना , मधुर - मधुर ध्वनि मोहवी कर्णा । 
सोहं शब्दे   गुणगुणली ।। २ ।।
वेणु कुणाची ? वृत्ति कुणाची ? वाजवि कोण नि मूर्ति कुणाची तुकड्यादासा मति कळली ॥ ३ ॥ 
- कलकत्ता , दि . २६ - १२ - १९५४ ९४८