हे नयनमनोहर रुप तुझे , बघुनी
( चाल : दो दिन के लिय मेहमान यहाँ . . )
हे नयनमनोहर रुप तुझे , बघुनी मन उन्मन होइ कसे ।
अति दिव्य प्रकाश पडे हृदयी ,जणु चंद्रकिरणही लाजतसे ।। धृ ।।
जड देह नसे जरि आसनि या , तरि अंतररुप दिसे सजुनी ।
किती काम विषय - उन्माद असो,तुज पाहनिया लपतात जसे ।। १ ।।
कर्णास तुझी धुन ऐकु पडे ,जरि वाद्य न बाहरि वाजविले ।
अति गोड रुची जिव्हेस मिळे,कुणि साखर टाकुनि खाति जसे ।।२।।
मधुगंध सुगंध खुले पसरे ,जरि धूप न दे कुणि अग्निवरी ।
तुकड्या म्हणे काय म्हणू तुज मी,नच शब्द स्फुरे जरि बोलतसे।।३।।
- परभणी , दि . १३ - ०१ - १९५५