स्थीर मने करु ध्यान, या सगळे
( चाल : जाये तो जाये कहाँ . . )
स्थीर मने करु ध्यान , या सगळे , साधुनि स्थान ।
मधुर स्वरे करु गुणगाण ॥ धृ० ॥
सुंदर किती ही प्रभात झाली । किलबिल पक्ष्यांची गुणगुणली ।।
वन वेली टवटवली छान ॥ १ ॥
निर्मक आसमान अति सुंदर हे । धूप दीपांचे गंध मधुर हे । ।
मुख मनोहर हस्ती भान ।। २ ।।
लैन धोनी सेवक बमले । मधुर ध्वनि वाद्यांचे चाले ॥
अति गंभिरही चालत तान ॥ ३ ॥
तुकड्यादास म्हणे तल्लिनता । ती ध्यानाची सुंदर महता
घ्या गुरुदेवाचे वरदान ।।४।।