सांगना कुणा सांगावे ? दुःख जिवभावे

( चाल : आरती करो हरिहर . . ) 
सांगना कुणा सांगावे ? दुःख जिवभावे , कुणी ऐकावे ? 
तुजविणा कुणाकडे जावे ! ॥ धृ० ॥ 
संसाराचे दुःख सहेना , अती कष्ट करुनीहि पुरेना ।
कोणि न देती साथ शेवटी , आपणची भोगावे । 
तुजविणा कुणाकडे जावे ? ॥ १ ॥ 
स्वार्थासाठी धावूनि येती , मित्र म्हणवुनि अपुले होती । 
प्रसंग येता दुःखद कसला , कोणि न देति पुरावे । 
तुजविणा कुणाकडे जावे ? ॥ २ ॥ 
ऐसिच ही दुनियेची रीती , कळली अनुभव घेता नीती । 
तुकड्यादास म्हणे सद्गुरुसी , वाटे जिव उधळावे । 
तुजविणा कुणाकडे जावे ? ॥ ३ ॥ 
- नागपूर , दि . ०९ - ०३ - १९५५