विराट देहासी लोक किती असे
विराट देहासी लोक किती असे । ते सांगेन खासे गुरुकृपे ॥
वसे नाभीस्थानी भूलोक सकळ । हृदयी निर्मळ ध्रुवलोक ॥
वक्षस्थळी साजे स्वर्गलोक पूर्ण । कंठी वसे जाण महलोक ॥
वसती वदनी जनलोक सारे । लल्लाटी तो थारे तपोलोक ॥
मस्तकी तो राहे सत्यलोक जाण । संतांचे प्रमाण तुकड्या म्हणे ॥