सीता गंगा वाहे पूर्वेचिये भागा
सीता गंगा वाहे पूर्वेचिये भागा । वाहे चक्षुगंगा पश्चिमेसी ॥
नदी भद्रा वसे रया ! उत्तरेसी । अष्टका दक्षिणेसी गंगा राहे ||
वैकुंठ नगर पश्चिमेसी पाहे । तेथे विष्णू राहे लक्ष्मी शक्ती ॥
पूर्वभागी वसे ब्रह्मा नित्य जाण । सत्रावी घेऊन शक्ती तेथे ॥
उत्तरेसी शोभे कैलासी महेश । पार्वतीसह वास करी तेथे ॥
वसे यमलोक भागी दक्षिणेचे । माणिक म्हणे वाचे बोलवेना ॥