आस इतुकी उरली की, मिठी मारिन श्रीसद्गुरुसी
(चाल: अभंगाची)
आस इतुकी उरली की, मिठी मारिन श्रीसद्गुरुसी ॥ धृ0||
जशी मारिली नारायणे, रामदास तुरकोबाने ।
ब्रह्मी-ब्रह्म एक राशी, ऐसे घडो एक दिशी ।।१॥
ध्यान धरीन विठोबाचे, चित्तामाजी चैतन्याचे ।
मूर्ति पाहीन भगवंताची, वेगे जाईन वैकुंठासी ॥२।।
आस पुरविल तो जगदीश, जो का पार्वतीचा ईश ।
दास तुकड्या ज्याचा शिष्य, नमन करी आडकुजीसी ।।३।।