हिन्द पुत्रा जाग तू, घर चारि बाजुनि चेतले

(चालः आळशा तुजभोवती....)
हिन्द पुत्रा जाग तू, घर चारि बाजुनि चेतले ।
धर्म जातो, देश जातो, अनुभवूनी  पाहिले l।धृ०।।
मोह दाबुनिया धनाचा, धर्म सोडा बोलती ।
लाखो, करोडो बहकले, जातात अजुनीही खुले ।।१।।
हेरगिरि करण्या कितीतरी, तरुण सापडती तया ।
देश पोखरला असा, ते    शत्रु   बनती    आपुले ।।२।।
धान्य जाते, रक्त जाते, तरूण-तरुणी किति असे ।
हाभाळ तरि ये शुध्दिवरी, हे पहा तरी जे ऐकिले ।।३॥
क्षणाची काळजी, ज्यांच्यावरी अम्ही सोपली।
सोह  सत्तेचा    तया,   ते    आंधळे  आंधाळले ॥४॥
क्रांन्ति करि आता तरी, झोपू नको हे आळशा !
दास तुकड्या सांगतो, जगणे तरी शिक चांगले ।।५॥