चुकलासा मार्ग वाटे, तुज ठावे श्रीहरी !
(चालः मंजुळ हा नाद आला...)
चुकलासा मार्ग वाटे, तुज ठावे श्रीहरी !
करि करुणा धावुनीया, नच वेळा ही बरी ।।धृ०।।
पावन तू दिव्य खाणी, सर्वांचा जाणता ।
तुज न कळे कोण ऐसा, त्रैजगती वानता ?
वृत्तीचा साक्षि तूची, जागृत या अंतरी ।
करि करुणा 0।।१।।
स्वार्थाचे लोक सारे, जरि देती मान हे ।
ना व्हावा मोह यांचा, न भुलावे भान हे ।
मन फिरवी विषय मार्गे, बळवृत्ती बावरी ।
करि करुणा 0।।२।।
तव पायी चित्त माझे, निशिदिन हे राहू दे ।
स्व-सुखाच्या या प्रवाही,स्वच्छदे वाह दे ।
तुकड्याचा योग हाची , उरु देई ना उरी ।
करी करुणा 0।।३।।