आयु ही अनमोल पण, झगडे कराया का दिली ?

(चाल: हिंदभूष्या लेकरा ।...)
आयु ही अनमोल पण, झगडे कराया का दिली ?
न्याय मिळण्या झगड पण स्वार्थास जावे का बळी ?॥धृ०।l
मोह सत्तेचा धरोनी,
ढोंग   सेवेचे   करी ।
जनता जरी फसली तरी, उलटेल सारे   लागली ।।१॥
चोर जरि साधू  बने  तरि-
किति दिवस लपवीतसे ?
काक हंसाचे स्वरुप घे, का छटा टिकते  खुली ?।।२।।
मासुळीचे रुप धरुनी,
पोहतो मांनव  जरी ।
किति वेळ चाले हे असे ? येईल मुळच्या पाउली ।।३।।
म्हणुनि म्हणतो मानवा ।
तू समज मानवता पुरी ।
तुकड्या म्हणे सार्थक करी, पण ओळखी घे आपुली ।।४।l