चाल प्रकाशाकडे मानवा
(चाल : उठा गड्या अरुणोदय झाला...)
चाल प्रकाशाकडे मानवा, तिमिराधातुनी ऊठ पुढे ।
मृत्यूच्या जबड्यात राहशील, तरी पेटतील सर्व मढे ॥धृ०।।
सत्य समजुनीअसत्य त्यागी, हीच साधना नित्य करी ।
वो ऊ दे जरि चुकाहि घडल्या, पुन्हा न हो याद करी ।।१।।
मृत प्राशन करि ज्ञानाचे, सुसंगतीचा मोह धरी ।
लेसाराचे सुख - दुःख हे, मृगजळ समजी वरी - वरी ॥२।।
कचि राहो समाधान तुज, जी सेवा निष्काम घडे ।
तुकड्यादास म्हणे त्या मार्गे, उध्दरुनी जाऊ सगळे ॥३॥