कोणी म्हणे देव वसे हृदयात

कोणी म्हणे देव  वसे   हृदयात । पहा पंढरीत तुका बोले ॥
सांबभक्त सारे वाढविती काशी । नकळे आम्हासी कोठे देव ॥
कैसे ते स्वरूप? कोठे आहे उभा ? । लावण्याचा गाभा संत बोले ।।
म्हणे तुकड्यादास दावील जो देव । त्यासी गुरुराव म्हणो नये ॥