वादे कुणा काय भेटलासे देव ?
वादविवाद पुरे
वादे कुणा काय भेटलासे देव ? । जरी नाही भाव शुद्ध अंगी ॥
ऐसे ते कितीक गेले पुढे जाती । यमास आयती शिकार ते ॥
जगामध्ये कीर्ति व्हावी वाटे ऐसे । देवावरी खासे पाणी सोडी॥
म्हणे तुकड्यादास देव तो पाहिजे । चरण धरीजे संतांचे ते ॥