तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अनेकांची मते अनेक निघती
अनेकांची मते अनेक निघती । आपणची गाती किर्ती मोठी ॥
म्हणे माझा पंथ ऐसा मोठा आहे । या हो ! लवलाहे पंथी माझ्या ॥
होती वादावाद निशिदिनी सदा । कोणी त्या गोविंदा न मानेचि ॥
म्हणे तुकड्यादास परोक्ष हे ज्ञान । घेऊनी तरण होई काय ? ॥