विषय हा घ्यावा सोपा

विषय हा घ्यावा सोपा । वादे कोण तरला बापा ? ॥
लीनता ती   ठेवोनिया । वाद करावा रे राया ! ॥
सद्गुरु चरणा    वाचोन । शब्द न बोलावे जाण ॥
तुकड्या म्हणे हे सोपे रे । आत्मज्ञानी लीन हो रे ! ।।